औरंगाबाद: केंद्रीय राज्य मंत्री डॉ भागवत कराड Union Minister of State Dr Bhagwat Karad यांनी आपल्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे. सिडको येथील त्यांच्या निवासस्थानी कौटुंबिक हा सोहळा पार पडला. डॉ कराड यांच्या भगिनी दीपा गीते, उज्वला दहिफळे यांनी त्यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली आहे. तर त्यांच्या पत्नीने पाडव्या निमित्त ओवाळून सण साजरा केला आहे.
Bhaubeej Wishes In Marathi 2022: असा भाऊ सर्वांना मिळू दे ! डॉ कराड यांच्या बहिणीने व्यक्त केली भावना - असा भाऊ सर्वांना मिळू दे
Bhaubeej Wishes In Marathi 2022: केंद्रीय राज्य मंत्री डॉ भागवत कराड Union Minister of State Dr Bhagwat Karad यांनी आपल्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली आहे. सिडको येथील त्यांच्या निवासस्थानी कौटुंबिक हा सोहळा पार पडला.
असा भाऊ सर्वांना मिळावाडॉ कराड यांच्या भगिनींनी एकत्र भाऊबीज साजरी करत असताना आनंद व्यक्त केला आहे. आमच्या सारखा भाऊ सर्वांना मिळावा. त्यांनी स्वतः सोबत कुटुंबियांच्या प्रगतीचा विचार केला आहे. त्यांच्यामुळे अनेक अडचणीतून मार्ग देखील निघाले. त्यांच्या सारखा भाऊ मिळणे, म्हणजे भाग्य आहे अस मत भगिनी दीपा गीते यांनी व्यक्त केले आहे.
दोन्ही काळात सोबतीला: प्रत्येक वर्षी आम्ही एकत्र सण साजरा करत असतो. कुटुंब सोबत राहतो, त्याचा एक वेगळा आनंद मिळतो, अस भगिनी डॉ उज्वला दहिफळे यांनी व्यक्त केले आहे. पूर्वीपासून आम्ही एकत्र राहतो. आयुष्यातील खराब आणि चांगला काळ सोबत काढला आहे. आता चांगले दिवस आहेत. मात्र आम्ही भाऊ बहीण सोबत आहोत आणि आयुष्यभर सोबत राहू, अस मत डॉ कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांनी व्यक्त केले आहे.