औरंगाबाद-कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावेळी अंशता लॉक टाळेबंदी औरंगाबादमध्ये असणार आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये संचारबंदी असणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्णता संचारबंदी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 11 मार्च ते चार एप्रिल या दरम्यान अंशतः टाळेबंदी औरंगाबाद शहरामध्ये असेल. आज कॅबिनेट बैठक झाल्यानंतर याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
औरंगाबाद शहरात अंशतः टाळेबंदीसह कार्यक्रमांवरबही निर्बंध लादण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सभा आठवडी बाजार, तरण तलाव, मॉल, शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भाचे सर्व नियम पाळणे आवश्यक असल्याचा अवाहन औरंगाबादच्या नागरिकांसह राज्यातील सर्व जनतेला करण्यात आले आहे. जेणेकरून वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल.
हेही वाचा -विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तुल अन् 28 जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक