गंगापूर, औरंगाबाद -गंगापूर तालुक्यातील शरीफपुर वाडी ग्रामस्थांनी गावातील मारुती मंदिरासमोर चितारचत सामूहिक आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. शरीफपूरवाडी ते आंबेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक आंदोलन करून, निवेदन देऊन कोणीच दखल घेत नसल्याने रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महिलासह सामूहिक आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. चांगला रस्ता दया किंवा सरणावर जळू दया अशी मागणी आदोलकांनी केली आहे.
Mass self immolation movement रस्त्यासाठी शरीफपुरवाडी ग्रामस्थांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन - Mass self immolation movement
गंगापूर तालुक्यातील शरीफपुर वाडी ग्रामस्थांनी गावातील मारुती मंदिरासमोर चितारचत सामूहिक आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. शरीफपूरवाडी ते आंबेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक आंदोलन करून, निवेदन देऊन कोणीच दखल घेत नसल्याने रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महिलासह सामूहिक आत्मदहन आंदोलन सुरू केले आहे. चांगला रस्ता दया किंवा सरणावर जळू दया अशी मागणी आदोलकांनी केली आहे.
स्वातंत्र्यापासून पक्का रस्ता झालाच नाहीगंगापुर शहरापासून अवघा पाच किलोमीटर अंतर असलेला शरीफपुरवाडी ते आंबेवाडी रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. रस्त्याभावी अनेक नागरिकांचे जीव गेले, पावसामुळे शालेय विद्यार्थीना शाळेत जाता येत नसुन मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. स्वातंत्र्यापासून शरीफपुरवाडी ते आंबेवाडी हा पक्का रस्ता झालाच नाही. वेळोवेळी मागणी करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचे हत्यार उपसले आहे. गंगापूर पोलिसांनी आंदोलन कर्त्यास रचलेल्या सरणावरून बाजुला केले आहे. परंतु, जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा -Nitin Gadkari नितीन गडकरी संतापले! म्हणाले, हे थांबवले नाही तर कोर्टात जाणार