महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुलीची हत्या करून दाम्पत्याने केली आत्महत्या; कारण मात्र अस्पष्ट - दाम्पत्यांने केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कुटूंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मुलीची हत्या करून दांम्पत्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News
मुलीच्या हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या

By

Published : May 19, 2023, 2:05 PM IST

Updated : May 19, 2023, 2:17 PM IST

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरशहरात आत्महत्या, खून असे प्रकार नेहमीच घडत असतात. आज अशीच एक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले. मुलीची हत्या करून दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे, पोलीस सध्या शोध घेत आहे. संभाजीनगरजवळील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगाव येथील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आज उघडकीस आली. वळदगाव येथे मोहन प्रतापसिंग डांगर वय 30, पूजा मोहन डांगर वय 25 व श्रेया वय पाच वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

रात्री घडली घटना : मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय मिळवटून टाकणारा प्रकार घडला. सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या त्यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचेही मृतदेह घाटीत रवाना केले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.

१८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या : समलैंगिक संबंधांच्या तणावातून नागपूरमध्ये एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 8 मे रोजी उघडकीस आली होती. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी तरूणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या तरूणीचा कल समलैंगिकतेकडे होता. तिने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली होती. घरच्यांनी तीला विरोध केला होता. म्हणून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते.

Last Updated : May 19, 2023, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details