महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यंदा कर्तव्य आहे'; आठ महिन्यात तब्बल 46 मुहूर्त - लग्नाचे मुहूर्त

तुळशी विवाहानंतर लगीन घाईला सुरुवात झाली असून मंगळवारी (20 नोव्हेंबर) कार्तिक महिन्यातील पहिल्याच मूहुर्तावर अनेकांनी शुभविवाह उरकून घेतले. यंदा २० नोव्हेंबरपासून विवाहासाठी मुहूर्त सुरू झाले असून ते जून २०२० पर्यंत चालणार आहेत. यासाठी आठ महिन्याच्या काळात ४६ लग्नाचे मुहूर्त आहेत.

marriage dates
विवाह मुहूर्त

By

Published : Nov 27, 2019, 10:41 AM IST

औरंगाबाद - तुळशी विवाहानंतर लगीन घाईला सुरुवात झाली असून मंगळवारी (20 नोव्हेंबर) कार्तीक महीन्यातील पहील्याच मुहर्तावर अनेकांनी शुभविवाह उरकून घेतले. यंदा २० नोव्हेंबर पासून विवाहसाठी मुहूर्त सुरू झाले असून ते जून २०२० पर्यंत चालणार आहेत. यासाठी आठ महिन्याच्या काळात ४६ लग्नाचे मुहूर्त आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा : शिवसेना देणार पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांना निमंत्रण

लग्नाचा बार उडवण्यासाठी वधू-वर पक्ष सज्ज झाले असून नातेवाईकांकडून सोयरीक सोडवण्यावर भर दिला जात आहे. तुळशी विवाहानंतर विवाहास धूमधडाक्यात सुरुवात होते. मात्र, यावर्षी गुरुचा अस्त असल्याने यंदा कर्तव्य असलेल्यांना तुळशी विवाहानंतर तब्बल २७ दिवस मुहूर्ताची वाट पाहावी लागली. मुहूर्तानुसार नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार झाला. नोव्हेंबर मध्ये ज्यांनी विवाह निश्चित केले आहेत. त्यांच्याकडे पत्रिका छपाई वाजंत्री मंडप आचारी बस्त्याची तयारी सुरू आहे. १२ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत गुरूच अस्त आहे. त्यामुळे तुळशीविवाह नंतर तब्बल २७ दिवस विवाह सुरुवात होणार आहे.

२० नोव्हेंबर २०१९ ते १५ जून २०२० या कालावधीत एकूण ४६ मुहूर्त आहेत. यावर्षी तुळशी विवाहनंतर तब्बल ९ दिवसांनी विवाह मुहूर्त प्रारंभ झाला. यंदा डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभमुहूर्त राहणार नाहीत. विशेष म्हणजे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ शुभमुहूर्त आहेत. यावर्षी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात एकूण ११ मुहूर्त असल्याने वधू-वर पित्याची आता पासूनच लगीनघाई सुरू झाली असल्याचे पुरोहित सतीश खोचे गंगापूरकर यांनी सागीतले. गत वर्षी गुरुची अस्त असतानाही ८६ मुहूर्त होते, मात्र यावर्षी गुरुच अस्त लग्नसराईत असल्यामुळे ४६ मुहूर्त असल्याचे वेदशास्त्रसंपन्न दीपक जोशी यांनी सागीतले.

हेही वाचा - अजित पवारांची चूक माफ करुन त्यांना पक्षात घ्यावे, छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details