औरंगाबाद - 'जमियत उलमा हिंद मौलाना मैमुद मदनी संघा'तर्फे आज(13 डिसेंबर) एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक(कॅब) विरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठया संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
एनआरसीसह नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा
मोर्चात मोठया संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी नागरिकांनी काळ्या फिती बांधून तसेच काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी, तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले.
एनआरसीसह नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात कन्नड तहसील कार्यालयावर मोर्चा
हेही वाचा -नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, 'सीएबी' आणि 'एनआरसी' विधेयक संविधान विरोधी - तिस्ता सेटलवाड
मोर्चात सहभागी नागरिकांनी काळ्या फिती बांधून तसेच काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला. तसेच, या विधेयकांना विरोध करणारे पोस्टरही मोर्चेकऱ्यांनी हातात घेतले होते. यावेळी, तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.