महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; ध्वजारोहनाला मुख्यमंत्री हजर मात्र इम्तियाज जलील यांनी पुन्हा मारली दांडी - Mukti Sangram Day Siddharth Park Aurangabad

शहरातील सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुक्ती संग्राम दिन

By

Published : Sep 17, 2019, 11:54 AM IST

Updated : Sep 17, 2019, 12:06 PM IST

औरंगाबाद- मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सिद्धार्थ उद्यान येथे सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्यावतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

मुक्ती संग्राम दिन प्रसंगी संबोधन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा दांडी मारली. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी सोशल मीडियावर विनंती करण्यात आली होती. खासदार म्हणून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आमदार असताना गेली पाच वर्षे इम्तियाज जलील यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने मुक्तीसंग्राम दिनाला येणे टाळले आहे. त्यामुळे जलील मुद्दाम कार्यक्रमास येण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश उपस्थित होत आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावून घेतले होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. या वेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे आज या दिनाला विशेष महत्त्व आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा-हर्षवर्धन जाधवांचा 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' विधानसभेच्या 6 जागा लढवणार

तसेच मराठवाडयात दुष्काळमुक्तीसाठी सरकारने अनेक काम केली आहे. कायम स्वरूपी दुष्काळ संपवण्याचा सरकारचा संकल्प असून त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक घेऊ, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसेनानींना आणि नागरिकांना भेटून शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Sep 17, 2019, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details