महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : मराठवाडा आणि विदर्भ उद्योगांना मिळणारी सबसिडी पुन्हा सुरू करणार - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis

विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांना (Marathwada and Vidarbha industries) चालना देण्यासाठी देण्यात येणारी सबसिडी (resume subsidies) देण्याचा निर्णय होता. तो मधल्या काळात बंद करण्यात आला. मात्र ही सबसिडी पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली. तर समृध्दी सारखा नागपूर गोवा महामार्ग सुरू होणार असून; हा मार्ग मराठवाड्याला लाभदायक असेल. तसेच हा मार्ग झाल्यास चार जिल्ह्यांना साऊथ सोबत व्यवसाय करण्यासाठी सोप होईल, असा विश्वास औरंगाबाद येथील औद्योगिक महा एक्सपो येथे फडणवीस यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Jan 8, 2023, 7:22 PM IST

प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद :पुढील दोन वर्षात अग्रिकलचर वर असलेला विजेचा भर सोलर वर करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना स्वस्त वीज देतांना त्याचा ताण उद्योगांवर येतो. तो कमी झाल्यास उद्योजकांना स्वस्त वीज मिळेल. पर्यायाने उद्योजकांना फायदा होईलस, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

सबसिडी सुरु करणार : चांगल्या सुविधा असल्या तर, नवीन उद्योग येतात. चांगल्या क्षमतेची औद्योगिक निर्मिती होत आहे. आमचे सरकार आल्यावर असा एक दिवस नाही, ज्या दिवशी आम्ही गुंतवणूक दारांशी चर्चा करत नाही. अनेक जण महाराष्ट्रात यायला तयार झाले आहेत. शासन त्यासाठी तयार पाहिजे. आधी पंधरा महिने बैठक झाली नाही. आम्ही सहा महिन्यात दोन बैठका घेऊन, नव्वद हजार कोटीची गुंतवणूक आणली. मोठी गुंतवणूक राज्यात, मराठवाड्यात येणार आहे. शंभर एकरचे प्लॉट राखीव केले. ओरिक मधे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगांना (Marathwada and Vidarbha industries) चालना देण्यासाठी देण्यात येणारी सबसिडी (resume subsidies) देण्याचा निर्णय होता. तो मधल्या काळात बंद करण्यात आला. मात्र ही सबसिडी पुन्हा सुरू करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चीन मधील उद्योग बंद होण्याच्या मार्गावर :आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरवले, औरंगाबाद मध्ये भरवले प्रदर्शन वेगळे आहे. उद्योजकांमध्ये वेगळी जिद्द आहे. चांगली औद्योगिक वसाहत निर्माण झाली. भविष्य ऑरिक औरंगाबाद आणि जालना होणार आहे. समृध्दी महामार्ग मुंबईला जोडला गेला की, झपाट्याने विकास होईल. उद्योग वाढायचे असेल तर कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. सुदैवाने संधी असलेला काळ कधीही आला नव्हता. जगातील अर्थव्यवस्थेत पाचवे स्थान आहे. मंदीच्या काळात आपली वाढ होत आहे. मोदी जींनी राबवलेल्या योजनांमुळे आम्ही आठ टक्क्यांनी वाढत आहे.

भारत हा क्षमतापुर्ण देश :जगाचा चीन वरचा विश्वास उडाला. चाळीस टक्के उत्पादन एकटा चीन करत होता. मात्र त्यांच्या नियमांमुळे आणि असुरक्षितता त्यामुळे जगातील गुंतवणूकदार चीन मधून बाहेर पडत आहेत. विविध देशांचे उद्योग बाहेर पडत आहेत. त्यांना एकच देश क्षमतेचा वाटतो तो फक्त भारत आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळत आहे. पुढील वीस वर्षात अशी संधी येणार नाही, म्हणून आता तयार राहायला हवं. सरकार आणि उद्योजक यांनी तयार राहावं. औद्योगिक संघटना पुढाकार घेतात ही चांगली गोष्ट आहे. कनेवेंशन सेंटर बांधकामासाठी राज्यासोबत केंद्राची मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार. ओरीक कनेक्टिव्हिटी समृध्दी सोबत झाली की, त्यांना त्याच्यावरून आणायचं. म्हणजे समस्या होणार नाही, असं देखील फडणवीस यांनी सांगितले.



आम्ही जमिनीवर राहणारे :औद्योगिक वसाहत प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत येणार होतो. मात्र ऐन वेळी विमान खराब झाले. तसे आम्ही हवेत नसतो, आमच्या सोयीसाठी विमान वापरतो. आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे माणसं आहोत. जमिनीवर चालणाऱ्या लोकांशी आमचा संपर्क आहे. नेमकी हवेत कोण आहे? याची तपासणी केली पाहिजे. सामना वर बोलणार नाही, तो काही पेपर नाही. कर्नाटक सीमा वादावर सरकार गंभीर आहे, विधीतज्ञ हरीश साळवे यांच्याशी बोलणं झालं आहे. आपली बाजू मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details