छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गावोगावी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.त्यांचा दौरा 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दर्शनानं होणार आहे. आमच्या नावानं कोणी पैसे मागितले, तर त्यांना देऊ नका असं जरांगे यांनी म्हटलंय.
असा असेल दौरा :आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी याआधी दोन टप्प्यात नागरिकांशी संवाद साधला होता. त्याचाच आता तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यात 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
15 नोव्हेंबर - वाशी, परांडा, करमाळा
16 नोव्हेंबर - दौंड, मायणी
17 नोव्हेंबर - सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
18 नोव्हेंबर - सातारा, मेंढा, रायगड
19 नोव्हेंबर - रायगड, पाचाड, मुळशी, आळंदी
20 नोव्हेंबर - सोलापूर, पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण
21 नोव्हेंबर - ठाणे, पालघर, नाशिक, त्रिंबकेश्वर
22 नोव्हेंबर - विश्रांतनगर, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर - नेवासा, शेवगाव, बोधेगाव, अंतरवाली अशा पद्धतीनं या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यापुढे आणखीन तीन टप्पे असून त्यात विदर्भ, मराठवाडा, कोकणाचा समावेश असेल, अशी माहिती जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.