छत्रपती संभाजीनगरManoj Jarange :आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाची सुरुवात करणार आहोत. मात्र, या आंदोलनाचा राम मंदिर सोहळ्याशी काहीच संबंध नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. राम मंदिर सोहळा अभिमानाचा कार्यक्रम आहे, आम्ही पण धर्माला मानतो. 18 जानेवारीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू असल्यानं 20 जानेवारी तारीख ठरवली. आतापर्यंत मुदत दिल्याचा 54 लाख लोकांना फायदा झालाय. आमच्या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आम्हाला वेळ हवा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी माणसं आहेत, त्यांना मराठ्यांशी काही देणं घेणं नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
गोळी घातली, तरी माघार नाही :मराठा समाजाला टिकणारंआरक्षण दिलं पाहिजे. आम्हाला वाटत नाही की, आम्हाला लवकर आरक्षण मिळेल. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. मात्र, मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी मुंबईत यावं लागणार आहे. मुंबईत मुंग्यासारखे मराठे रस्त्यावर उतरणार आहेत. आम्हाला गोळ्या घातल्या तरी, आम्ही मागं हटणार नाही. मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या प्रत्येकाला पायी घेऊन मुंबईत जाणार, असा निर्धार देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय. एकदा आम्ही मुंबईत गेल्यावर आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. आरक्षण न दिल्यास युवकांचे हाल होतील. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले.