महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"शिवाजी महाराजांचा अवमान केला तर याद राखा" - sanjay raut

शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड व छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना करणाऱ्यांना मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे इशारा देण्यात आला आहे.

maratha kranti thok morcha on sanjay rauts statements
मराठा क्रांती ठोक मोर्चा औरंगाबाद

By

Published : Jan 17, 2020, 3:00 PM IST

औरंगाबाद -छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गादीचा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध औरंगाबाद मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदींची महाराजांशी तुलना करणाऱ्यांनाही इशार दिला आहे.

"शिवाजी महाराजांचा अवमान केला तर याद राखा"

हेही वाचा -'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'

कोरे म्हणाले, सेना भवनावरील महाराजांची प्रतिमा वर लावावी अन्यथा आम्ही ते लावण्याच काम करू असा इशाराच त्यांनी शिवसेनेला दिला आहे. औरंगाबादेत मराठा क्रांतीमोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने इशारा देण्यात आला.

संजय राऊत असो किंवा जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांचा सन्मान केलाच पाहिजे. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलना केली जात होती, त्यावेळेस कुठलाही राजकीय पक्ष यावर बोलला नाही. पण ज्यावेळेस संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या बद्दल वक्तव्य केले, त्यानंतर मात्र सर्वांनी त्या वादात उडी घेतली. राजकारणासाठी महाराजांचा चाललेला अवमान मराठा समाज सहन करणार नाही असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

हेही वाचा - सांगली बंद ! शिवप्रतिष्ठानच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details