महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा क्रांती मोर्चाच्या मशाला यात्रेला परवानगी रद्द, आंदोलक मुंबईकडे कूच करण्यावर ठाम - Mumbai for reservation

सर्वोच्च न्यायलयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आयोजित मशाल यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही नियोजित तारखेला मशाल यात्रा काढण्यावर क्राती मोर्चा ठाम आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मशाला यात्रेला परवानगी रद्द
मराठा क्रांती मोर्चाच्या मशाला यात्रेला परवानगी रद्द

By

Published : Nov 29, 2020, 3:00 PM IST

Updated : Nov 29, 2020, 4:09 PM IST

औरंगाबाद - मराठा क्रांती ठोकमोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रा काढण्यात येणार होती, मात्र ऐनवेळी पोलिसांनी यात्रेला परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. तसेच मराठा मशाल जागृती ही यात्रा पूर्वनियोजनाप्रमाणे 8 डिसेंबरला मुंबईत जाणारच, असा इशारा आंदोलक समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला. या आंदोलना संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...

यात्रेसाठी विशेष रथ-

औरंगाबाद ते कोपर्डी येथे जाऊन मशाल पेटवून आंदोलनाला सुरुवात होणार होती. रायगडच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्श असलेली माती कपाळी लावून महाराजांची प्रतिमा डोक्यावर घेऊन मुंबईपर्यंत पायी प्रवास करत आंदोलन करण्यात येणार होते. यादरम्यान गावागावात जनजागृती करण्यासाठी विशेष रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर मराठा समाजाच्या मागण्या लिहिण्यात आल्या असून हा रथ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा समाज आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली.

मराठा क्रांती मोर्चाच्या मशाला यात्रेला परवानगी रद्द
मातोश्रीवर आमरण उपोषण-

शनिवारी निघणाऱ्या उपेक्षित मराठा क्रांती मोर्चाच्या मशाल यात्रेला परवानगी नाकारली असली तरी ठरलेल्या दिवशी म्हणजेच आठ डिसेंबरला ही यात्रा मुंबईत दाखल होईल. त्यावेळी कोपर्डी येथील पीडितेचे आई वडील तिथे सोबत असतील. त्यादिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा करावी, आमच्या मागण्यांबाबत सरकारच धोरण काय आहे? आम्हाला न्याय देण्यासाठी सरकार काय करणार आहे? याबाबत भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा मराठक्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मतोश्रीसमोर आमरण उपोषण सुरू करेल. त्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारली तरी चालेल मात्र आम्ही उपोषण करू आणि त्यावेळी राज्यात जर काही घटना घडल्या तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

Last Updated : Nov 29, 2020, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details