औरंगाबाद- सरकारच्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे शेतकरी आणि विद्यार्थी संवाद मेळावा घेण्यात आला. पैठण गेट भागातील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या मेळाव्यात सरकारने मराठा समाजासह, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याने सरकार विरोधात 30 सप्टेंबर पासून यात्रा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली. अहमदनगर महामार्गावर कायगाव टोका येथून या यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा काढणार 30 सप्टेंबर पासून सरकार विरोधात यात्रा - aurngabad maratha kranti morcha news
मराठा क्रांती ठोक मोर्चाने याआधी सरकारला प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन दिले, अनेक मोर्चे काढले. मात्र, सरकारने मागण्यांबाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. मराठा समाजाची फसवणूक सरकारने केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक सरकारने केली.

हेही वाचा-औरंगाबाद महानगर पालिका आयुक्तांवर कारवाई करा - खासदार इम्तियाज जलील
मराठा क्रांती ठोक मोर्चाने याआधी सरकारला प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन दिले, अनेक मोर्चे काढले. मात्र, सरकारने मागण्यांबाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. मराठा समाजाची फसवणूक सरकारने केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक सरकारने केली. आम्ही विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिलो तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला. शेतकऱ्यांना सरकार आश्वासन देण्यापालिकडे काहीच करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील सरकार करत आहेत. त्यामुळे सरकार विरोधी यात्रा काढणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयकांनी जाहीर केले होते. त्यानुसार 30 सप्टेंबर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे याने गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान दिले होते. त्या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात करणार असल्याचा निर्णय मेळाव्यात जाहीर करण्यात आला.