औरंगाबाद -आठ दिवसात सरकारने मराठा समाजातील आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदत दिली नाही तर मातोश्री समोर ठिय्या आंदोलनाल करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. सरकार आमची फसवणूक करत असून दिलेला शब्द पाळत नसल्याने, हे पाऊल उचलणार असल्याचे मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी सांगितले.
...तर मातोश्रीवर ठिय्या; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलन
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठा समाजाच्या 42 तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले मात्र, त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये ८ ऑगस्टला आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मराठा समाजाच्या 42 तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या तरुणांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले मात्र, त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये ८ ऑगस्टला आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले. ही कारवाई म्हणजे सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील आणि आप्पासाहेब कुढेकर यांनी केला.
पोलिसांनी कारवाई करत असताना आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल केला. या कुटुंबीयांना सरकारी नौकरी द्यावी, अशी मागणी करण्यात येत असताना त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून नौकरीस अपात्र ठरवण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप आप्पासाहेब कुढेकर यांनी केला. 8 ऑगस्टपासून आत्महत्याग्रस्त तरुणांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले. शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांची कारवाई होणे हे चुकीचे असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आमचे आंदोलन भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांचा अवमान केला. त्यामुळे आठ दिवसांनी आम्ही आत्मदहन आंदोलन आणि मातोश्री समोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला.