औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, अन्यथा विधानसभा निवणुकीत मराठा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत असेल, असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी सेना-भाजपला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
...अन्यथा मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाणार - हर्षवर्धन जाधव - मराठा आरक्षण
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा, अन्यथा विधानसभा निवणुकीत मराठा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत असेल, असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी सेना-भाजपला दिला आहे. मराठा
हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून तब्बल 2 लाख 86 हजार मते मिळवत सर्वांनाच धक्का दिला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव आणि वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते ही सत्ताधारी पक्षांची चिंता वाढवणारी आहेत. याचाच फायदा घेत हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नाही, तर विधानसभा निवडणुकीत मराठा समाज वंचित आघाडी सोबत जाईल, असा ईशारा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात शांततेने मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्याही केल्या. सरकार फक्त आश्वासन देत असून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता युती सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर आम्ही प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊ आणि आगामी निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सोबत लढवू, असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.