महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation News : मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; मंत्रालयावर काढला लाँग मार्च

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण व प्रलंबित मागण्यासाठी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका ते मंत्रालय मुंबई येथे आज लॉंग मार्च काढण्यात आला आहे.

Maratha Kranti Morcha
मराठा क्रांती ठोक मोर्चा

By

Published : Mar 1, 2023, 3:18 PM IST

संभाजीनगर ते मुंबई लॉंग मार्च

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर): मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी चार चाकी ७० ते ८० वाहनांसह, शेकडो समन्वयकांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर आक्रोश लॉंगमार्च मुबंईकडे रवाना झाला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारवर टीका केली. मराठी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची सहा महिन्यांपासून एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीवर नेमलेल्या चंद्रकांत पाटील यांची समितीवरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.



काकासाहेब शिंदे यांना अभिवादन: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी घेऊन, हुतात्मा झालेले स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला जिल्ह्याभरातील मराठा समाजातील बांधव, तरुण मोठ्या संख्येने जमा होऊन काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, काकासाहेब शिंदे अमर रहे अमर रहे, एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देण्यात आल्या.


राज्य सरकारवर टीका:मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यावेळी नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची सहा महिन्यांपासून एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे समितीवर नेमलेल्या चंद्रकांत पाटील यांची समितीवरून हकालपट्टी करावी. तसेच आरक्षणाविषयी अधिवेशनात आवाज न उठवल्यास मतदारसंघात आल्यावर लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याचे मराठी क्रांती मूक मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे. तसेच मराठा समाजाला हक्काचे ओबीसी मधून टिकणारे आरक्षण द्यावे. आरक्षण देणे जमत नसेल तर सरकारमधील आमदार, मंत्र्यांनी राजीनामे द्यावे. जर आमदार लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात मराठा आरक्षण व अन्य मागण्यासंदर्भात आवाज उठवला नाही तर, प्रत्येक मतदारसंघात लोकप्रतिनिधींना आल्यावर त्यांना जाब विचारला जाईल.


यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती: मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रवींद्र काळे पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, प्रा.माणिकराव शिंदे पाटील, अनिल कुटे पाटील,अप्पासाहेब जाधव, अंकुश काळे पाटील, विजू शेळके पाटील, मनोज पाटील मुरदारे, धनंजय चिरेकर पाटील, संतोष कुशेकर, विजय शेळके, अमोल हुंबे, प्रसाद साबळे, आशा केरे पाटील, विजया मराठे, भारती पवार, गौरी चव्हाण, प्रतिक्षा पाटील, श्रद्धा पाटील आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, राहुल वडमारे, शुभम पालवे, नांगरे,आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



हेही वाचा: Maratha Reservation News राजकीय नेत्यांची उदासीनता मराठा आरक्षणाच्या मुळावर

ABOUT THE AUTHOR

...view details