महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Car Accident : औरंगाबाद -नगर महामार्गावर कारचा भीषण अपघात ; चार जण ठार, पाच गंभीर जखमी - कारचा भीषण अपघात

औरंगाबाद पुणे महामार्गावरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात (car accident on Aurangabad Nagar highway) झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार व पाच जखमी झाल्याची माहिती मिळाली (people died in car accident) आहे.

Car Accident
औरंगाबाद नगर महामार्गावर कारचा भीषण अपघात

By

Published : Nov 19, 2022, 8:25 AM IST

औरंगाबाद : औरंगाबाद पुणे महामार्गावरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात (car accident on Aurangabad Nagar highway) झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार व पाच जखमी झाल्याची माहिती मिळाली (people died in car accident) आहे. नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ दरम्यान एका स्विफ्ट कारमधून काही लोक नगरकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आदळल्याने कारमधील चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद नगर महामार्गावर कारचा भीषण अपघात


कार चालकाचा ताबा सुटला :औरंगाबाद -पुणे महामार्गावरील नवीन कायगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ नेवासा येथुन बजाजनगरला जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच 20 सि एस 5982 कार चालकाचा ताबा सुटला. डिव्हायडरवर गाडी जाऊन औरंगाबादहुन नेवासाकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार क्रमांक एम एस 27 बी झेड 38 89 या कारवर (accident on Aurangabad Nagar highway) आदळली.

चार जणांचा जागेवर मृत्यू : बजाजनगर येथील स्विफ्ट कारमधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. यामध्ये रावसाहेब मोटे(५६) सुधीर पाटील (४५) रा.वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) रा. वाळूज यांच्या सह एकाचा समावेश आहे. तर व्हॅगनारमधील शशीकला कोरट, सिध्दांत जंगले(१५), छाया हेमंत जंगले(४०), शकुंतला जंगले(७०) राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले आहे. रुग्णवाहिकेद्वारे अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले, तर मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात (Car Accident) आले.


वाहतूक कोंडी :रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे औरंगाबाद पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा काही काळ खोळांबा झाला होता.गंगापूर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत (Aurangabad Nagar highway) केली.

ABOUT THE AUTHOR

...view details