छत्रपती संभाजीनगरManoj Jarange Patil : मराठा युवक आत्महत्या (Maratha Youth Suicide) करत असताना दिवाळी (Diwali 2023) साजरी करणार नाही. तसेच माझं कुटुंबीय देखील माझ्यासोबत राहतील. हा एक सुखाचा दिवस न पाहता मराठा समाजाच्या युवकांना आयुष्यभराचं सुख देण्यासाठी मी आंदोलनात आहे. त्यामुळं रुग्णालयातून सोडल्यावर मी गावी जाईल मात्र, घरी जाणार नाही असं मत मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं. तर भोकरदन तालुक्यात मराठा मुलांना मारहाण करणाऱ्या लोकांना आणि त्यांना सांगणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला देखील रस्त्यावर यावं लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी (Jarange Patil Reaction On Maratha Reservation) दिला आहे.
मनोज जरांगे उपचार घेऊन निघाले गावाकडं : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण सुरू केलं. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आपल्या आंदोलन मागं घेतल्यानंतर, त्यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी त्यांना सोडण्यात आलं. यावेळी मी आता गावी जातोय, पण घरी जाणार नाही आणि दिवाळी देखील साजरी करणार नाही, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून भेटायसाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार होतं, मात्र ते अद्याप आलं नाही. पुढील दोन दिवसात ते येईल आणि अंतरवाली सराटी इथं येऊन भेटू शकतात. मात्र नंतर मी दौऱ्यावर जाणार असल्यानं पाहू पुढं काय होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
गेल्या दहा दिवसांपासून उपचार झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशी मला रुग्णालयातून सोडण्यात आलं. यावेळी मी आता गावी जातोय, पण घरी जाणार नाही आणि दिवाळी देखील साजरी करणार नाही. -मनोज जरांगे पाटील
ओबीसी नेत्यांनी हट्ट करू नये: जालना जिल्ह्यात ओबीसी नेते आंदोलन करणार आहेत, अशी माहिती मिळाली. मात्र यात ओबीसी बांधवांचा काही दोष नाही, नेत्यांनी हट्टीपणा करू नये. लोकांना वेठीस धरण्याचं काम हे काही लोकं करतात. मात्र ओबीसी बांधव त्याला बळी पडणार नाही, आमच्याकडं नोंदी सापडत असल्यानं आता ओबीसी समाजातील आमच्या मागणीशी सहमत आहेत. सरकार ज्या नोंदी प्रमाणपत्र देत आहेत, ते सर्व खोटं असल्याचा आरोप केला जातोय. मात्र कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या आमचं सुरू झालंय, जे होईल ते आता पुढं पाहू असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त करत ओबीसी नेत्यांवर टीका केली. कायदा सांगतो लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावं, त्यामुळं आम्ही त्यानुसार घेऊ, EWS आरक्षण नको ते तुम्हालाच ठेवा असं देखील त्यांनी सांगितलं.