महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुजबळांनी ओबीसींचं वाटोळं केलं. मराठ्यांनो मिळेल त्या गाडीनं मुंबईकडं कूच करा; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन - मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Issue : २० तारखेला कोणीही घरी राहू नये. मिळेल त्या वाहनानं मुंबई गाठावी, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं. सध्या त्यांनी २० जानेवारीला मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज मिळेल त्या गाडीनं मुंबईला येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Maratha Reservation Issue
मनोज जरांगे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 9:40 PM IST

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणावर भाष्य

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Maratha Reservation Issue : महाराष्ट्रातलं साखळी उपोषण स्थगित करण्यात यावं. कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागत आहे, असं समाज बांधवांचं म्हणणं आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व आंदोलकांनी सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन यावं, आंदोलन हे किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. (Manoj Jarange Patil ) हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे, आता आरक्षण घेऊनच येऊ, असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. (Manoj Jarange Patil Mumbai hunger strike)

जलद गतीनं काम करावं : सरकार आरक्षण देण्यासाठी चालढकल करत आहे. मला समाज बांधवांचे आंदोलनासाठी खूप फोन येत आहेत. वेळेवर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारनं वेळोवेळी हुलकावणी दिली. त्यामुळे आम्ही मुंबईचा मार्ग निवडला आहे. २० जानेवारीला मराठा समाजानं मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. उद्या चालून ओबीसीतच आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे. आंदोलन यशस्वी झाल्यावर सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. इंद्रा साहनी खटला हे सांगतो की, आरक्षण ५० टक्क्यांवर गेलं की टिकत नाही. त्यामुळं मला शंका आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आतापर्यंत ५४ लाख लोकांना आरक्षण मिळालं. जालन्यात १ नोंदीवरून ७० लोकांना आरक्षण मिळालं. फडणवीस यांना एक विनंती आहे की मागासवर्गीय आयोगानं जलदगतीनं काम करावं अशा सूचना कराव्यात. ज्या ठिकाणी नोंदी निरंक आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा काम करावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

तारखेनंतर वेगळं चित्र दिसेल : कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काही सरकारी अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नांदेडमधील नायगावच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम केलं. जो अधिकारी पैसे घेऊन काम करत आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मुंबईत कलम १४४ लागू केल्यामुळे आम्ही २० जानेवारी तारीख निश्चित केली आहे. देवालाही वाटतं की आमचं कल्याण व्हावं. मुंबईसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं. मंत्री, खासदार, आमदारांनी मराठ्यांच्या दारात येणं बंद करावं. मी ही समाजात जनजागृती करणारं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर ठाम : 20 तारखेनंतर सगळ्यांच्या विकेट घेणार आहे. कोणालाही माहीत नाही की, आमच्या टीम कशा पद्धतीनं कामाला लागल्या आहेत. आमचे लेकरं खूप काही अडचणीत आले आहेत. तुम्हाला २० तारखेनंतर वेगळं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळेल. मराठे करोडोच्या संख्येनं बाहेर पडणार आहे, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. तर आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर ठाम आहोत. भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे. ओबीसींचं वाटोळं करण्याचं काम भुजबळ यांनी केलं. गावाकडे आमचे आणि ओबीसी यांचे चांगले संबंध आहेत. भुजबळ माझ्यावर आरोप करत आहेत, त्याबाबत माझी नार्को टेस्ट करा, असं आव्हान जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिलं.

हेही वाचा:

  1. अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले माझ्या वेळेस सर्वांनी विचार करून निर्णय घेतला
  2. संतप्त ग्रामस्थांनी गाव काढलं विकायला; गैरसोयींचा पाढा वाचत गाव विक्रीच्या बॅनरबाजीची जिल्ह्यात चर्चा
  3. तुमच्या दिव्याखालचा अंधार बघा, देव, देश आणि धर्माची चिंता सोडा; रामलल्लाच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर शिंदे गट-भाजपाकडून घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details