छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil :मराठा मुलांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातंय. याकडे मराठा नेत्यांनी लक्ष द्यावं. तसंच बीडमध्ये जे भुजबळ साहेबांच्या पाहुण्यांचं हॉटेल फोडलं ते त्यांच्याच लोकांनी फोडले अशी मला माहिती आहे, जर माहिती चुकली तर शब्द मागे घेईन. मात्र एकमेकांच्या द्वेशापोटी हे सगळं केलं गेलंय असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज (7 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, रात्री सीएम ऑफिस मधून फोन आला होता. उद्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ येणार असून सगळे म्हणताय ते आम्हाला भुलवताय मात्र ते इतकं सोप नाही. उद्याच्या दिवस त्यांची वाट पाहू अन्यथा त्यांना फोनही करणार नाही, पुढची भूमिका आम्ही घेऊ असं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलं.
ओबीसी नेत्यांबद्दल बोलणार नाही : ओबीसी नेत्यांबाबत मला बोलायचं नाही, मराठा समाजानं शांततेत एकत्र यावं. पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्यांना सांगतो, गोर गरिबांच्या नेत्यांना फसवलं जातंय. आज तुम्ही ते केलं नाही तर उद्या ते तुमच्या सोबत राहणार नाहीत. ओबीसी नेते बीडला जाऊन आपल्या समाजाचं खच्चीकरण करताय. पुरवणी याद्या तयार करून आमच्या लोकांना फसवलं जातंय. ते लोकं काल एसपीला सुद्धा भेटले. सरकारनं याकडं लक्ष द्यावं, उद्रेक करणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र उगाच सामान्य लोकांना फसवू नका. त्रास देण्यासाठी ओबीसीचे काही नेते कट रचतायत. मात्र लक्षात ठेवा खोटे गुन्हे दाखल करून समाज खचणार नाही. काही ओबीसी नेते असे डाव करताय, मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या मागे उभं राहावं आणि नाही उभे राहिले तर आम्ही सक्षम आहोत. तसंच यांच्या बीडवाऱ्या सुरू असून जाणून बुजून मराठा लोकांना टार्गेट केल्या जातंय असंही ते म्हणाले.