महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत तिहेरी हत्याकांड, एकाच घरातील तिघांचा खून - chaudhari colony murder case aurangabad

एका माथेफिरू तरुणाने घरात घुसून धारदार चाकूने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (25सप्टेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घरातील सदस्यांना काही समजण्याच्या आतच त्याने धारदार चाकूने घरातील तिघांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगानेच तो घराबाहेर आला.

प्रेतिनिधीक छायाचित्र

By

Published : Sep 25, 2019, 11:32 PM IST

औरंगाबाद - एका माथेफिरू तरुणाने घरात घुसून धारदार चाकूने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज(25सप्टेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही घटना शहरातील चौधरी कॉलनी भागात घडली. दिनकर भिकाजी बोराडे (वय 55), कमळ दिनकर बोराडे(वय 50), भगवान दिनकर बोराडे(वय 25) अशी मृतांची नावे आहेत, तर अमोल बोर्डे (वय 25) असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

माथेफिरू तरुणाने घरात घुसून केली तिघांची हत्या

रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास आरोपी अमोल हा बोराडे यांच्या घरात घुसला व आतून दरवाजाची कडी लावली. घरातील सदस्यांना काही समजण्याच्या आतच त्याने धारदार चाकूने घरातील तिघांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगानेच तो घराबाहेर आला. त्याच्या शरीरावर रक्ताचे डाग पाहून परिसरातील नागरिक घाबरले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपी अमोलला अटक केले. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details