महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीला विवस्त्र करून केली हत्या; आरोपी पती फरार - औरंगाबाद पत्नीचा खून

पतीने विवस्त्र करून हात-पाय बांधून हातोड्याने आणि धारदार हुकने वार करुन पत्नीची हत्या केली. औरंगाबाद शहरातील अरुणोदय कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. राम काळे हा आरोपी पती फरार आहे.

Murder
हत्या

By

Published : Feb 15, 2020, 4:54 PM IST

औरंगाबाद - शहरातील अरुणोदय कॉलनीत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला. पतीने पत्नीला विवस्त्र करून हात-पाय बांधून हातोड्याने आणि धारदार हुकने शरीरावर वार केले. राम काळे असे आरोपी पतीचे नाव असून तो सध्या फरार आहे.

पत्नीला विवस्त्र करून केली हत्या

पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नी दोन मुलासह जालना जिल्हा सोडून औरंगाबादमध्ये आली होती. ती एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून कामाला होती. सहा दिवसांपूर्वी तिचा पती रामही तेथे कामासाठी आला होता. शनिवारी सकाळी ठेकेदार रामला कामावर नेण्यासाठी घरी आला तेव्हा घरात पीडिता नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा अडीच वर्षीय मुलगा तिच्या मृतदेहा शेजारी झोपलेला होता. याबाबत ठेकेदाराने पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा -धक्कादायक ! चालकावर संशय आल्याने तरुणीने चालत्या रिक्षातून मारली उडी

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पीडितेचे दोन्ही हात पाय कापडाने बांधलेले होते. तिच्या शरीरावर हातोड्याने आणि बांधकामात वापरल्या जाणाऱ्या टोकदार हुकने वार केलेले होते. हत्येनंतर आरोपी पतीने 6 वर्षीय मुलाला सोबत घेऊन पळ काढला. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details