औरंगाबाद - पैठण तालुक्यातील बाशी गेवराई येथील २८ वर्षीय तरुणाने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. बाबासाहेब चंद्रहार कणके असे मृत तरुणाचे नाव आहे.
२८ वर्षीय तरुणाची विष पिऊन आत्महत्या - डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले
बाशी गेवराई येथील बाबासाहेब कणके याने शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबादास खुटेकर यांच्या शेतात विष प्राशन केल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी रामेश्वर कणके यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या बाबत अधिक माहिती अशी की, बाशी गेवराई येथील बाबासाहेब कणके याने शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबादास खुटेकर यांच्या शेतात विष प्राशन केल्याचे आढळून आले. त्याला उपचारासाठी रामेश्वर कणके यांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संपत दळवी, पो.ना.जाकेर शेख हे करत आहेत.