औरंगाबाद- कन्नड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडवाड गावाजवळील शिवना नदी पात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बाबूलाल हरिचंद्र वाघ (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील एका व्यक्तीचा शिवना नदीत बुडून मृत्यू - औरंगाबाद
कन्नड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडवाड गावाजवळील शिवना नदी पात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बाबूलाल हरिचंद्र वाघ (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गावकऱ्यांना शिवना नदी पात्रात बाबूलाल वाघ यांचा देह तरंगताना आढळला होता. याबाबत गावकऱ्यांनी कन्नड शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बलभीम रावत व पोलीस कॉन्स्टेबल बोंद्रे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व बाबूलाल वाघ यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व्ही.एल. सुरडकर यांनी बाबूलाल यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व्ही.एल.सुरडकर यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हुसेनखान पठाण करीत आहे.
हेही वाचा-'या' कारणामुळे राज्यात औरंगाबादकर भरत आहेत सर्वाधिक पाणीपट्टी!