महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाजगी बँकेत काम करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या - औरंगाबाद आत्महत्या न्यूज

शहरातील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत मनोज सराफ (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

By

Published : Apr 17, 2021, 3:28 PM IST

औरंगाबाद - खाजगी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रशांत मनोज सराफ (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रशांत गेल्या काही दिवसांपासून खाजगी बँकेत काम करत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रशांतने घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ प्रशांतला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी घरगुती कारणातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पती-पत्नीची विषारी औषध घेऊन आत्महत्या -

कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून पती-पत्नीने शेतात विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कन्नड तालुक्यातील खामगाव येथे ही घटना घडली. रामेश्वर जगन्नाथ गायके (वय 34) आणि आश्विनी रामेश्वर गायके (वय 30) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. गायके पती-पत्नी रात्री शेतात पाणी भरण्याचा निमित्ताने गेले होते. त्यावेळी त्यांनी विष घेवून आत्महत्या केली. रामेश्वर गायके हे सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी झाले होते. त्यांना यंदाही फारसे उत्पन्न झाले नाही. त्यामुळे लोकांचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

हेही वाचा -12 वर्षांच्या मुलासह दाम्पत्याची आत्महत्या; पन्हाळा तालुक्यातील गोठे गावची घटना

ABOUT THE AUTHOR

...view details