औरगांबाद -कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द येथील गजानन भाऊसाहेब वाघ (२३) युवकाने रात्री स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन वाघ गुरुवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याने घरातील नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेतातील विहिरीजवळ त्याचा मोबाईल आढळल्याने नातेवाईकांनी पोलीस पाटील रामकृष्ण नारायण वाघ यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील वाघ यांनी सदर माहिती पिशोर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर युवकाचा मृतदेह विहिरीच्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. नंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. तेथील डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.