औरंगाबाद -चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने २ अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधमाविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाबुराव चौधरी असे आरोपीचे नाव आहे.
गावातील एका किराणा दुकान चालकाने एका शाळेत शिकणाऱ्या २ अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेऊन, दोघांवरही अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तसेच कुणाला हा प्रकार सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर पुन्हा या नराधमाने दोघींना परिसरातल्या एका शेतात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला, आणि या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही या मुलींना दिली.