औरंगाबाद - जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने खरीप पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. त्यामुळे वैजापूर - पैठण - कन्नड या भागांमध्ये पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
औरंगाबादच्या पाचोडमध्ये अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान - औरंगाबाद पाचोड अतिवृष्टी बातमी
पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पाचोड महसूल मंडळातील पाचोडसह थेरगाव, लिमगाव, हर्षी, बाबर वाडी, नांदर, दादेगाव, कडेठाण, मुर्मा या परिसरात अतिवृष्टी झालेली आहे. सततच्या पावसाने कपाशी लागलेली बोंडे खाली पडायची वेळ आली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी कणसांना कोंब फुटले आहेत. सर्वच पिके धोक्यात आल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.
पाचोडसह परिसरातील अनेक गावातील घरांमध्ये पाणी गेल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पाचोड महसूल मंडळातील पाचोडसह थेरगाव, लिमगाव, हर्षी, बाबर वाडी, नांदर, दादेगाव, कडेठाण, मुर्मा या परिसरात अतिवृष्टी झालेली आहे. सततच्या पावसाने कपाशी लागलेली बोंडे खाली पडायची वेळ आली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी कणसांना कोंब फुटले आहेत. सर्वच पिके धोक्यात आल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. यामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोसंबी, डाळिंब बागेत पाणी साचल्याने फळबागांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावन्याची भिती निर्माण झाली आहे. सरकारने या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.