औरंगाबाद/जळगाव - कन्नड तालुक्यात झालेल्या पावसामुळे केळीची शेती उद्ध्वस्त झाली आहे. नागद भिलदरी या भागात गडदगड नदीला पूर आल्याने केळीची बाग वाहून गेली अक्षरशः मातीच्या जागी वाळू आल्याचे पाहायला मिळाले.
मंगळवारी जोरदार पाऊस कन्नड-चाळीसगाव भागामध्ये झाला. या पावसामुळे छोट्या मोठ्या नद्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहिल्या. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले. नदीलगत असलेली जमीन धसली आणि असलेली पीके वाहून गेली. ज्यामध्ये केळी, अद्रक, मका, मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी जमीन पूर्ण वाहून गेली. अशी अवस्था झाली की मातीच्या जागी वाळूचे ढिगार दिसून आले. काही ठिकाणी पाच एकर, सात एकर अशी जमीन वाहून गेली. त्याचबरोबर पीकेही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले
- तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्याच्या पुढील दहा ते पंधरा गावांना पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास एक हजार हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी दिवसभर पिकांचे पंचनामे करण्याचे काम करण्यात आले. असे असले तरी पंचनामे करून काही होत नाही. प्रत्यक्षात मदत मिळणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
- कन्नड घाटात दरड कोसळली -
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटातील दरड कोसळली. यात एक ट्रक दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर दोन ते तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला होता. जड वाहतुकीसाठी हा रस्ता आता धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नांदगाव येथील पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
- सरकारने आता कुठल्याही निकषाविना मदत करावी; पूरग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला. तितूर आणि डोंगरी नद्यांना पूर आल्याने या तिन्ही तालुक्यातील 38 गावे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली असून, या गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.Body:शेकडो जनावरांचीही हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका हा चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. येथील सुमारे 16 हजार हेक्टरवरील पिके वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. Conclusion:'आमचं होत्याचं नव्हतं झालंय, सरकारने आता कोणतेही निकष न लावता मदतीचा हात द्यावा, कोकणातील पूरग्रस्तांना ज्या पद्धतीने तातडीने मदत मिळाली तशीच, मदत आम्हाला करावी', अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा - डोंगरी नदीच्या पुरात घर-दार गमावणाऱ्या बागुल कुटुंबाला भावना अनावर -
'रक्ताचे पाणी करून संसार उभा केला होता. आता कुठे चांगले दिवस आले होते. पण अतिवृष्टीमुळे डोंगरी नदीला पूर आला आणि आमचं घर-दार, पशुधन वाहून गेले. पाणी प्यायला साधा एक ग्लासही उरलेला नाही. अंगावरचे कपडे तेवढे उरलेत. आता पुढे कसे जगायचे? हा खरा प्रश्न आहे. या पुराने तर आमचे सर्वस्व हिरावून नेलं आहे', या भावना आहेत; विश्वजित दौलतराव बागुल यांच्या... डोंगरी नदीला आलेल्या पुरात त्यांचे घर-दार वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 'त्या' काळरात्रीचा थरार 'ईटीव्ही भारत'कडे कथन करताना बागुल कुटुंबीयांना गहिवरून आले.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गिरणा, तितूर नद्यांना पूर