औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ( Gram Panchayat Election Results ) लागत असताना अनेकांची धाकधूक वाढली होती मात्र त्यात चार ग्रामपंचायत निवडणूकीत ( Gram Panchayat Election ) दोन उमेदवारांना समान मत मिळाली. त्यामुळे निर्णय घेणे अवघड झाले, कोण जिंकणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना देवचिठ्ठी काढून निकाल लावण्यात आला. यात काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्य आमनेसामने असल्याचं पाहायला मिळाली.
Grampanchayat Result 2022 : ग्रामपंचायत निवडणूक निकाल; चुरशीच्या लढतीत ईश्वरचिठ्ठीने ठरवले तीन उमेदवारांचे भवितव्य - ईश्वर चिट्टी ग्रामपंचायत निकाल औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गराडा गावात दोन सख्ख्या मावस जावा एकमेकांसमोर ग्रामपंचायत निवडणूक ( Gram Panchayat Election Results ) रिंगणात आमनेसामने होत्या. उध्दव ठाकरे गटातून पूजा सचिन राठोड तर एकनाथ शिंदे गटातून रेश्मा राहुल राठोड निवडणूक लढल्या. दोघींना ही 540 अशी समान मत पडली. त्यावेळी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोघांच्या नावाने ईश्वरचिठ्ठी ( Lucky Draw decided ) टाकण्यात आली त्यात उध्दव ठाकरे गटाच्या पूजा राठोड विजयी झाल्या.
सख्ख्या मावस जावांचा सामना : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गराडा गावात दोन सख्ख्या मावस जावा एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात आमनेसामने होत्या. उध्दव ठाकरे गटातून पूजा सचिन राठोड तर एकनाथ शिंदे गटातून रेश्मा राहुल राठोड निवडणूक लढल्या. दोघींना ही 540 अशी समान मत पडली. त्यावेळी ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोघांच्या नावाने चिठ्ठी टाकण्यात आली त्यात उध्दव गटाच्या पूजा राठोड विजयी झाल्या. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळालं.
ईश्वर ठिकाणी चिठ्ठीने ठरले नशीब : औरंगाबाद तालुक्यात दोन ठिकाणी दोन उमेदवारांना समसमान मत मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढून निकाल लावण्यात आला. त्यामधे लायगाव ग्रामपंचायत येथे नामदेव बोंगाने आणि चंद्रकांत बोंगाने यांना 189 अशी सारखी मत मिळाली. त्यात ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ज्यामधे चंद्रकांत बोंगाने विजयी झाले. तर पिंपळगाव पांढरी ग्रामपंचायत निवडणुकीत जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 अशी समान मत मिळाली. ईश्वर चिठ्ठी काढत जयश्री ठोंबरे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.