औरंगाबाद - आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र, काही लोकांच्या भाषणातच मराठवाडा आहे, विकास नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Criticize Shivsena over Marathwada ) यांनी शिवसेनेवर केली. ते लासूर येथे जाहीर कार्यक्रमात बोलत होते. ( Devendra Fadnavis in Lasur )
शिवसेनेवर टीका -
अनेकांनी मराठवाड्याला खूप दिले असे सांगतात. मात्र, फक्त त्यांच्या भाषणात मराठवाडा आहे. फक्त नाव वापरतात. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचा या सरकारने खून नाही आहे, कवच कुंडल काढून घेतली. आम्ही दुष्काळ मुक्त मराठवाड्याचे स्वप्न पाहिले होते. शेतकरी हताश होता. आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी योजना आणली. मात्र, या सरकारने त्या योजनेचाही खून केला. मराठवाड्यासोबतच हा व्यवहार याची नोंद घ्यावी लागेल.
समुद्रात वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणणार होतो. मात्र, ही सरकार यासाठी ही काही करत नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने हा भाग झाला असता. औरंगाबाद शहराने शिवसेनेला ओळख दिली. या शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना आम्ही दिली होती. मात्र, सरकार बदलले आणि यांनी निर्णय बदलला. साधे पाणी हे लोक शहराला देत नाहीत, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली.