महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : 'लॉकडाऊन'काळात पुस्तक विक्री घटली, ई-वाचकांच्या संख्येत वाढ - औरंगाबाद ई-वाचकांच्या संख्येत वाढ बातमी

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू करण्यात आली होती. या काळात ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांना दुकाने बंद असल्याने पुस्तके घेता आली नाही. परिणामी या काळात ई-वाचकांची संख्या वाढली. मात्र, याचा परिणाम पुस्तक विक्रीवर झाले आहे.

books
पुस्तके

By

Published : Aug 24, 2020, 8:27 PM IST

Updated : Aug 24, 2020, 8:43 PM IST

औरंगाबाद- मार्च महिन्यापासून लागलेल्या लॉकडाऊननंतर पुस्तक विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वत्र दुकान बंद असल्याने वाचकांना पुस्तकांपर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी पुस्तक विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ई-वाचकांची संख्या मात्र वाढली आहे. पूर्वी 15 ते 20 टक्के वाचक ही पुस्तके ऑनलाइन पद्धतीने वाचत होती. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या ई-वाचकांची संख्या चार पटीने वाढल्याची माहिती, साकेत प्रकाशनचे साकेत भांड यांनी सांगितली.

'लॉकडाऊन'काळात पुस्तक विक्री घटली
पुस्तक विक्रीवर प्रकाशकांचे सर्व अर्थकारण चालत असते. यामध्ये संगणकात काम करणारा विभाग, सफाई काम करणारा विभाग, चित्रकार, अशा अनेकांची उपजीविका प्रकाशनावर चालत असते. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हे अर्थचक्र थांबल्याने प्रकाशकांच्या अडचणी वाढल्या असल्याची माहिती आदित्य प्रकाशनचे प्रकाशक विलास फुटाणे यांनी दिली. कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. या अनुषंगाने पुस्तक विक्री आणि प्रकाशनावर झालेल्या परिणामाचा झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुस्तक विक्री 90 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तीन महिन्याच्या लॉकडाऊन काळात वाचकांना पुस्तकांपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे पुस्तक विक्री शून्यावर गेली. जून महिन्यांपासून व्यवहार सुरळीत झाले असले तरी पुस्तक विक्री अजूनही मंदावलेली आहे. तर दुसरीकडे पुस्तक प्रकाशन करताना महत्वाचे घटक असणारे प्रूफ रीडर, संगणकावर काम करणारे कर्मचारी यांच्याकडून घरूनच काम करून घ्यावे लागत आहे. मात्र, विक्री नसल्याने या सर्वांच्या कामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रकाशक अडचणीत आले असल्याची माहिती आदित्य प्रकाशनचे विलास फुटाणे यांनी दिली.

पुस्तक विक्रीवर परिणाम झाला असला तरी ई-पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पूर्वी इ-वाचक कमी होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांचीही दुकाने बंद होती. त्यामुळे वाचकांनी ऑनलाइन वाचनास सुरुवात केली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ई-वाचकांची संख्या चार पटीने वाढली आहे. अनलॉक झाल्यावर वाचक ई-वाचक कमी झाले असले तरी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत ई-वाचक निश्चित वाढला आहे. त्यामुळे काही प्रकाशन थेट ई-पुस्तक तयार करून घेतल्याची माहिती साकेत प्रकाशनचे साकेत भांड यांनी दिली. पुढील किमान एक ते दीड वर्षतरी अशीच परिस्थिती राहण्याची भीती साकेत भांड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -संततधारेमुळे शेतकरी अडचणीत; मूग, कांदा पिकांचे नुकसान

Last Updated : Aug 24, 2020, 8:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details