वैजापूर(औरंगाबाद) - वैजापूर शहरातील परदेशी गल्लीत एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून झन्नामन्ना खेळणाऱ्या 19 जुगाऱ्यांना पकडले. संतोष रामचंद्र राजपूत ऊर्फ धोनी याच्या घरावर टाकण्यात आलेल्या या धाडीत पोलिसांनी एक लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेली एक जण मात्र पोलिसांना हूल देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
वैजापुरात स्थानिक गुन्हे शाखेची जुगाऱ्यावर कारवाई - वैजापूर पोलीस बातमी
पोलिसांनी जुगाऱ्यांकडून एक लाख रुपयांसह तीन हजार रुपये किमतीचे पत्त्याचे कॅट व एक सतरंजी असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 20 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विजय जाधव, हवालदार राख, नागझरे, चव्हाण, चौधरी, पोलिस नाईक निकम, गांगवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
झन्नामन्ना नावाचा पत्त्यांचा जुगार - औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध व्यवसायांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्यासाठी शहरात आले होते. पथकास शहरातील परदेशी गल्लीतील संतोष राजपूत ऊर्फ धोनी याच्या घरात काहीजण झन्नामन्ना नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धोनीच्या घरावर धाड टाकली असता त्या ठिकाणी धोनीसह एकूण २० जण पत्त्यावर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. याच दरम्यान त्यांच्यातील एक जण पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पण त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून एक लाख रुपयांसह तीन हजार रुपये किमतीचे पत्त्याचे कॅट व एक सतरंजी असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 20 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विजय जाधव, हवालदार राख, नागझरे, चव्हाण, चौधरी, पोलिस नाईक निकम, गांगवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अशी आहेत पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे -संतोष रामचंद्र राजपूत ऊर्फ धोनी (रा. परदेशी गल्ली, वैजापूर), अनिल सुखालाल राजपूत (३१, रा. जीवनगंगा, वैजापूर), लक्ष्मण नामदेव जगताप (२८, रा. भगगाव, ता. वैजापूर), नारायण रामचंद्र राजपूत (५८, रा. परदेशी गल्ली, वैजापूर), मच्छिन्द्र आसाराम त्रिभुवन (६५, आंबेडकर नगर, वैजापूर), शेख हाजी अब्दुल हकीम (४६, परदेशी गल्ली, वैजापूर), गुलाबसिंग कपूरसिंग राजपूत (४८, रा. रोटेगाव स्टेशन, वैजापूर), शकील अहमद बेग (४०, शिवराई रोड, पंचशीलनगर, वैजापूर), जाकीर शहा मोहम्मद शहा (४८, रा. लाडगाव रोड, वैजापूर), शांतीलाल रामचंद्र राजपूत (५६, रा. कादरी नगर, वैजापूर), शेख जमीर शेख गणी (४७, रा. दर्गाबेस, वैजापूर), राजेंद्र बंडोबा हंगे (५४, रा. परदेशी गल्ली, वैजापूर), शेख फारूक शेख इस्माईल (४४, रा. खान गल्ली, वैजापूर), अशोक बापूराव टिळेकर (३८, रा. पोलिस स्टेशनजवळ, वैजापूर), शाहरुख बेग सबदर बेग (२७, रा. दर्गाबेस, वैजापूर), खलील अब्बास बेग (६८, रा. परदेशी गल्ली, वैजापूर), इफ्तेकार शहा गुलजार शहा (४६, रा. नाईकवाडी गल्ली, वैजापूर), शेख शकील शेख कलीम (४५, रा. जुन्या स्टेट बॅंकेजवळ, वैजापूर), उमेश केशवराव गायकवाड (४२, रा. परदेशी गल्ली, वैजापूर).