औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात लिंबाच्या झाडावर मंगळवारी (2 जून) बिबटया आढळून आला आहे. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तीवरील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे बिबट्या गांधारी नदीकडे पळून गेला.
कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात आढळला बिबट्या; शेतकऱ्यांना सर्तकतेचे आवाहन - Kannad farmer scared lepord
हतनूर शिवारातील गट नं. ४४५ मध्ये लिबांच्या झाडावर विठ्ठल दगडू खंडागळे यांना सकाळी त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर बिबटया आढळून आला.
कन्नड़ तालुक्यातील हतनूर शिवारात आढळला बिबट्या
हतनूर शिवारातील गट नं. ४४५ मध्ये लिबांच्या झाडावर विठ्ठल दगडू खंडागळे यांना सकाळी त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर बिबटया आढळून आला. वन कर्मचारी अशोक आव्हाड, सईद शेख व पोलीस पाटील प्रकाश पवार, संजय काळे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बिबट्याच्या संचारामुळे शेतवस्तीवरील कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.