महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अहमदनगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घटना - tiger

वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे जागीच शविच्छेदन केले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Apr 27, 2019, 10:41 AM IST

औरंगाबाद - अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना अहमदनगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कायगाव शिवारात घडली आहे. रस्ता ओलांडत असताना या बिबट्याला धडक बसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रस्त्यावरून काही अंतरावर असलेल्या गवतामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

कायगाव शिवारातील कलमीच्या ओढ्याजवळ या बिबट्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने बिबट्या फरफटत काही अंतरावरील गिन्नी गावा जवळ लंगडत गेला. जवळच २५ फुटावर शेतवसती असलेले शेतकरी अनिल आसाराम निकम हे तिकडे गेले असता, त्यांना गंभीर जखमी नर बिबट्या दिसला. त्यांनी लगेच प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे यांना दूरध्वनी करून बोलवून घेतले. बिबट्याच्या जवळ जाण्यास कोणीच धाडस करत नव्हते, अशा वेळी प्राणी मित्र रामचंद्र बिरुटे यांनी धाडस करून लांब काठीने बिबट्याचे शेपूट हलवून पाहिले. तो अर्धा तास जिवंत होता. त्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत बिबट्याच्या पायांचा माग पाहिला. त्यास कुठे कुठे इजा झाली याचे निरीक्षण केले. तो मृत नर बिबट्या अंदाजे साडे तीन ते चार वर्षे वयाचा असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे जागीच शविच्छेदन केले. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शविच्छेदनानंतर कलमीच्या ओढ्याजवळ सर्व शासकीय नियानुसार बिबट्याचे दहन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details