महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये वनविभागाच्या सहा तास शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद - बिबट्या बातमी औरंगाबाद

वनविभागाचे पथक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या परिसरातील एका घरामध्ये दडून बसला होता. वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. शेवटी 6 तासानंतर या बिबट्याला जेरबंद केले.

leopard-caught-in-aurangabad
वनविभागाच्या 6 तास शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

By

Published : Dec 3, 2019, 11:24 PM IST

औरंगाबाद - शहरातील एन वन सिडको येथील काळा गणपती मंदिराच्या मागील जॉगिंग ट्रॅकवर मंगळवारी सकाळी नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आज सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात पथकाला यश आले. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वनविभागाच्या 6 तास शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

हेही वाचा-'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यलय' मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्याने विदर्भातील जनतेला त्रास होणार नाही - नितीन राऊत

वनविभागाचे पथक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या परिसरातील एका घरामध्ये दडून बसला होता. वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. शेवटी 6 तासानंतर या बिबट्याला जेरबंद केले. त्यानंतर औरंगाबाद येथून 70 किलोमीटर अंतरावर असलेले कन्नड तालुक्यातील गौताळा अभ्यारण्यात बिबट्याला सोडण्यात आले. बिबट्याचा पिंजरा उघडताच काही सेकंदात तो अभ्यारण्यात दिसेनासा झाला. बिबट्याला सोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, तहसीलदार संजय वारकड, वनक्षेत्रपाल अधिकारी राहुल शेळके, शशी तांबे, नायब तहसीलदार हारुन शेख, तलाठी विकास वाघ, वनकर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details