औरंगाबाद -अनुसूचित जातीचे असल्याने बिल्डरने घर नाकारल्याचा धक्कादायक ( Lawyer Denied House Because Of Caste ) प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वकिलाने थेट पोलिसांत तक्रार दिली आहे. वकिलाच्या तक्रारीवरून 5 जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण -
औरंगाबाद खंडपीठात काम करणारे अॅड. महेंद्र गंडले यांनी जालना रस्त्यावरील भुमी विश्वबन या उच्चभ्रू सोसायटीत रो हाऊस पाहिले. त्यांनी 30 लाखांचे घर घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, तेथील कर्मचाऱ्याशी चर्चा करत असताना अॅड. महेंद्र गंडले यांनी आपण अनुसूचित जातीचे असल्याचा उल्लेख केला. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना त्यांना थांबण्यास सांगितले. काही वेळाने आपण अनुसूचित जातीचे असल्याने आपणास घर देता येणार नाही, असे अॅड. गंडले यांना सांगण्यात आले. रो हाऊस नाकारल्याप्रकरणी अॅड. महेंद्र गंडले यांनी चिखलठाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून बांधकाम व्यवसायिकासह 5 जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -Rekha Kamat Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन; माहिममध्ये घेतला अखेरचा श्वास