महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलन चिघळलं, पाहा सरपंचाने पेटवली नवीकोरी कार

Lathicharge on Maratha Protester : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर आता आंदोलन आणखी चिघळलंय. सर्वत्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलन करताना एका सरपंचाने त्याची नवीकोरी चारचाकी पेटवून दिलीय.

Maratha Protester
मराठा आंदोलन चिघळले

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 8:24 PM IST

मराठा आंदोलनात सरपंचाने पेटविली नवी चारचाकी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Lathicharge on Maratha Protester :जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आंदोलन आणखी चिघळलंय. त्याचे पडसाद आज राज्यभर दिसून येत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलनं करण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ता रोको, तर काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. त्यात फुलंब्री तालुक्यातील एका सरपंचानं भररस्त्यात स्वतःची चारचाकी पेटवून देत सरकारचा निषेध व्यक्त केलाय. मंगेश साबळे असं या सरपंचाचं नाव आहे. त्यांनी स्वतःची नवीकोरी गाडी पेटवून दिलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आलाय. या प्रकरणात अद्याप पोलीस कारवाई झालेली नाही. लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. (Lathicharge on Maratha Protester Jalna)

ठाकरे गटाचे निवेदन :जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला (lathi charge maharashtra) . घटनेचा जाहीर निषेध करण्याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा उद्धव ठाकरे गट शिवसेना संभाजीनगर शाखेतर्फे जाहीर निषेध केला जावा, या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, तत्पूर्वी संबंधित पोलीस अधीक्षक आणि या कारवाईचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडलं जाईल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार असेल. आपणास विनंती की, या कारवाईमध्ये जे कोणी संबंधित जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मराठा बांधवांना न्याय द्यावा, असं निवेदनात म्हटलंय. यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, विनायक पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Sarpanch burnt his car)

मराठा समाज आक्रमक : शुक्रवारी रात्रीपासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू करण्यात आली आहेत. तर शनिवारी सकाळी अनेक ठिकाणी निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आली आहेत. सरकारनं घेतलेली भूमिका चुकीची असून, मराठा समाज अन्याय सहन करणार नाही. आगामी काळात त्याची किंमत सरकारमधील मंत्र्यांना आणि आमदारांना चुकवावी लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. काही ठिकाणी भर रस्त्यात टायर जाळून सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात आंदोलनाचे पडसाद दिसून येतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. (Maratha Protester)

हेही वाचा :

  1. Lathicharge on Maratha Protester : लाठीचार्जच्या निषेधार्थ माहूरमध्ये कडकडीत बंद
  2. Lathicharge on Maratha Protester : ...म्हणून लाठीचार्ज करावा लागला; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
  3. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details