औरंगाबाद (आपेगांव) - येथील माऊली मंदीराच्या पाठीमागील गोदावरी नदी तीरावरील दगडी पिचिंग असलेला घाट खचू लागल्याने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, तसेच या घाटावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच सहा दिवसापांसून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या ठिकाणची माती दगडासह घसरु लागली आहे. त्यामुळे या परिसरातील घरांना धोका होऊन दगडी घाट कोसळल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
आपेगावमध्ये माऊली मंदिरामागे भूस्खलन, लोकांमध्ये भितीचे वातावरण - Mauli temple in Apegaon
माऊली मंदीराच्या पाठीमागील गोदावरी नदी तीरावरील दगडी पिचिंग असलेला घाट खचू लागल्याने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, तसेच या घाटावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच-सहा दिवसापांसून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या ठिकाणची माती दगडासह घसरु लागली आहे. त्यामुळे या परिसरातील घरांना धोका होऊन दगडी घाट कोसळल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
सदरील घाट हा मंत्री कल्याणराव पाटील शिसोदे यांच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज मंदीराला गोदावरीच्या पुराचा धोका होऊ नये म्हणून दगडी पिचिंग करून बांधकाम करण्यात आला होता. परंतु, गेल्या पाच सहा वर्षापुर्वी गोदावरी नदीवर माऊलीच्या मंदीराच्या पाठीमागे याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करून हा घाट बांधण्यात आला आहे. परंतु, या ठिकाणी अर्धवट काम झाल्याने गोदावरीच्या तिरावर राहत असलेल्या नागरीकांच्या घराला हा घाट कोसळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ या ठिकाणी दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
दरम्यान, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी येथील पाहणी करून, तहसीलदारांना माहिती दिली आहे.