औरंगाबाद : दरवर्षी शिवसेनेकडून काढण्यात येणारी कावड यात्रा, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक काढण्यात आली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या यात्रेत भाविक सहभागी होत असतात. याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. मात्र, सोमवारी मोजक्याच भविकांसह हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरात विधिवत पूजा करून, मंदिराच्या कुंडातील पाणी नेत खडकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.
औरंगाबाद : गिनीज बुकात नोंद असलेली कावड यात्रा यंदा प्रतिकात्मक - Khadkeshwar Mahadev Mandir aurangabad news
2017 साली सलग 500 फुटांची कावड यात्रा काढण्याचा विक्रमदेखील शिसेनेने आयोजित केलेल्या कावड यात्रेत झाला. मात्र, यंदा कोरोनाचे सावट अजून शहरात असल्यामुळे सोमवारी मोजक्याच भविकांसह हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरात विधिवत पूजा करून, मंदिराच्या कुंडातील पाणी नेत खडकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.
आठ वर्षांपूर्वी शिवसेनेने शहरात कावड यात्रेचे आयोजन केले. तेव्हापासून श्रावण महिन्यात या यात्रेचे आयोजन शिवसेना शहरात करत आहे. शहरात चांगला पाऊस पडण्यासाठी, शेतकऱ्यांना चांगले पीक येण्याच्या भावनेने ही यात्रा आयोजित केली जाते. 2017 साली सलग 500 फुटांची कावड यात्रा काढण्याचा विक्रमदेखील शिसेनेने आयोजित केलेल्या कावड यात्रेत झाला. मात्र, यंदा कोरोनाचे सावट अजून शहरात असल्यामुळे मोजक्याच भाविकांना सोबत घेऊन आमदार अंबादास दानवे यांनी हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरात जाऊन मातेचे विधिवत पूजन, महाआरती केली. तसेच पवित्र जलकुंडातून शहरात फार जुने असलेल्या खडकेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी कुंडातील पाण्याने कावड भरून, त्यानंतर वाहनाने ते खडकेश्वर मंदिर येथे जलाभिषेक करण्यासाठी गेले. दरवर्षी हरसिद्धी माता मंदिर ते खडकेश्वर पर्यंत भाविक खांद्यावर कावड घेऊन पायी जातात. यंदा मंदिर बंद असल्यामुळे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक उत्सव करण्यास बंदी घातल्यामुळे दानवेंसह अनेक भाविक वाहनाने खडकेश्वर मंदिरात गेले आणि जलाभिषेक केला.