औरंगाबाद - 'कारगिल विजय दिना'चे औचित्य साधून भारतीय सैन्याच्या पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा तरुणांचा अंतःकरणी बिंबवण्यासाठी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा देशभक्तीपर सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात मोफत दाखवण्यात आला. शहरातील विविध चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील युवकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला.
कारगिल विजय दिवस : 'उरी' पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी - young people
'कारगिल विजय दिना'चे औचित्य साधून भारतीय सैन्याच्या पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा तरुणांचा अंतःकरणी बिंबवण्यासाठी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा देशभक्तीपर सिनेमा औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात मोफत दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील युवकांमध्ये जोश जागवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार होत आहे.
तरुणांच्या अंगी देशभक्तीची भावना रुजावी, तसेच भारतीय सैन्याची पराक्रमाची व शौर्याची जाणीव युवकांना व्हावी, या उद्देशाने शुक्रवारी २६ जुलैला 'कारगिल विजय दिवसा'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील ४९७ चित्रपट गृहात हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. या माध्यमातून जवळपास अडीच लाख युवकांनी हा चित्रपट पाहिला. तसेच आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून शत्रूंपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या जवानांप्रती आपली सहनुभूती व्यक्त करण्यासाठी प्रत्येक युवकाने हा चित्रपट पाहावा व आपल्या मित्रांना देखील यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले होते.
"उरी - दि सर्जिकल स्ट्राईक" बद्दल...
हा चित्रपट १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीर मधील उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्यावर आधारित आहे. या हल्यात १८ सैनिक शहीद झाले होते. या हल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने ५० अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. १ जानेवारी २०१९ रोजी “उरी दि सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.