औरंगाबाद - कन्नड शहरातील वडारवाडा येथे शौचालयावरील पाण्याच्या टाकीत रसायन टाकून गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत 51 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सोबतच आरोपी गणेश मार्गू सुरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
कन्नडमध्ये दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त - कन्नडमध्ये गावठी दारु जप्त
शौचालयावर बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आरोपी गणेश सुरे हा रसायन सडवून पाइपद्वारे गावठी दारू गाळीत होता. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घरावर छापा टाकून गावठी दारू आणि रसायन असा एकूण 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, राजेंद्र मुळे ,कैलास करवंदे, किशोर राजपूत, गणेश गोरक्ष, दिलावरसिंग वसावे, शितल बारगळ यांनी केली. तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके स्थापन करून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.