औरंगाबाद -कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला असला तरी, काही नागरिक विनाकारण बाहेर पडतात. अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी कन्नड़ पोलिसांनी शहरात पथसंचलन केले.
कन्नड़ शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन - kannad police
कन्नड पोलिसांनी शहरात पथसंचलन केले आहे.
kannad police
कन्नड़ शहरातील पोलीस ठाण्यापासून, आण्णा भाऊ साठे चौक, बस स्थानक परिसर, पिशोर नाका, हिवरखेड़ा रोड, सिद्धिक चौक, माळीवाडा या भागामध्ये हे संचलन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, सहायक पोलीस निरीक्षक विद्या, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, कुतुभरे उपस्थित होते.