महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कन्नड़मधील अबाड़ी रोपवाटिकेत पकडलेल्या तडसाची आरोग्य तपासणी करुन गौताळा अभयारण्यात रवानगी

अंबाडी रोपवाटिकेत तडस दडून बसल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील लागवड अधिकारी श्रीमती सी.बी.बाणखेले यांनी दिली होती. तसेच, जंगली प्राण्यास जंगलात नेऊन सोडण्याची विनंती केली.

kannad news about wild animal send in forest
कन्नड़ येथील अबाड़ी रोपवाटिका येथे पकडलेल्या तडसाची आरोग्य तपासणी करुन गौताळा अभ्यारण्यात रवानगी

By

Published : Apr 12, 2020, 11:31 AM IST

औरंगाबाद (कन्नड) -माजी आमदार नारायणराव नागदकर अंबाडी प्रकल्पाशेजारील अंबाडी शासकीय रोपवाटिकेत दडून बसलेला जंगली तडसाला सुखरूप पकडण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या टीमला यश आले आहे.


या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, अंबाडी रोपवाटिकेत तडस दडून बसल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील लागवड अधिकारी श्रीमती सी.बी.बाणखेले यांनी दिली होती. तसेच, जंगली प्राण्यास जंगलात नेऊन सोडण्याची विनंती केली. त्यानुसार कन्नड येथील सहाय्यक वनरक्षक तथा रेस्क्यू टीमने या तड़सास पकडून मकरणपूर रोपवाटिका येथे वनकर्मचारी व पशुवैद्यकीय तपासणीत निगराणीत ठेवण्यात आलेले होते.

पशुवैद्यकीय अधिकारी पी. डी. चव्हाण यांनी तडसाची आरोग्य तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास योग्य असल्याबाबत खात्री करून वरीष्ठ परवानगीने गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

कन्नड़ येथील अबाड़ी रोपवाटिका येथे पकडलेल्या तडसाची आरोग्य तपासणी करुन गौताळा अभ्यारण्यात रवानगी

यावेळी प्रवीण कोळी, वनपरिमंडळ अधिकारी, रेस्क्यू टीम औरंगाबाद सद्यस्य एम. ए. शेख यांचेसह वनसेवक सईद शेख , अशोक आव्हाड वाहनचालक विकास बनकर उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details