महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जायकवाडी धरणातून २००० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून रविवारी सायंकाळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय जलविद्युत केंद्र, डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही विसर्ग सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र,धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

By

Published : Sep 15, 2019, 10:35 PM IST

जायकवाडी धरण

औरंगाबाद - पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून रविवारी सायंकाळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय जलविद्युत केंद्र, डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही विसर्ग सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र,धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातून २००० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

हेही वाचा - औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील 'नाझिया'चा मृत्यू

नाशिक आणि जायकवाडी धरणाच्या वरील धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात काही दिवसापासून पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाजातून 519 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर जलविद्युत केंद्रातून 1589 क्यूसेस, उजव्या कालव्यातून 600 क्यूसेस, आणि डाव्या कालव्यातून 700 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण 4937 क्यूसेस पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरू आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा औरंगाबाद दौरा : आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी पोलिसांच्या नजरकैदेत

धरणाचे दरवाजे उघडणार असल्याने हे नयमरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details