औरंगाबाद- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील बरेच वीज निर्मिती केंद्र बंद पडले आहेत. मात्र, पैठण येथील जायकवाडी धरणावर असलेले हायड्रो पॉवर स्टेशन हे अहोरात्र सुरू आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रातील औषध कंपनी आणि शेतकऱ्यांचे काम अजूनही चालू असल्याने विजेची खपत जितकी होती ती तितकीच राहिली आहे, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मोराळे यांनी दिली.
लॉकडाऊनमध्येही पैठणकरांसाठी जायकवाडी धरणाचे हायड्रो पॉवर स्टेशन अहोरात्र सुरू - जायकवाडी धरणाचा हायड्रो पॉवर स्टेशन अहोरात्र सुरू
लॉकडाऊनमुळे बऱ्याच प्रमाणात औद्योगिक क्षेत्र बंद असल्याने खबत कमी झाली आहे. मात्र पैठण तालुक्यात लॉकडाऊन आधी जितकी वीज लागत होती तितकीच आजही लागत असल्याचे महावितरण अभियंता हरके यांनी सांगितले. पैठण या औद्योगिक क्षेत्रात औषध उद्योग जास्त असल्याने व शेतात लागणाऱ्या विजेचे प्रमाण पहिल्यासारखेच असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर्षी महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची चांगली हजेरी झाल्यामुळे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले होते. एप्रिल महिन्यात ही जायकवाडी धरण हे साठ टक्के भरले असल्याने जायकवाडी धरणावर स्थित वीजनिर्मिती केंद्र सुरू आहे. सध्या निर्मिती केंद्रावर बारा मेगावॅट एवढी विजेची निर्मिती दररोज केली जाते. नदीपात्रात पाणी सोडताना व ते परत धरणात सोडताना दोन्ही वेळेस वीज निर्मिती केली जाते. याचा खर्चही इतर विज निर्मिती केंद्रापेक्षा कमी आहे. हीच वीज जायकवाडी धरणाच्या उत्तरेला असलेल्या 132 केव्हीच्या पावर स्टेशनवर पोहोचवली जाते आणि तिथून गरजेनुसार वाटप केली जाते.