महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्याची तहान भागणार.. जायकवाडीत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

जायकवाडी धरणात बुधवारी मध्यरात्री ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

जायकवाडी धरण

By

Published : Aug 7, 2019, 2:19 PM IST

Updated : Aug 7, 2019, 4:24 PM IST

औरंगाबाद - नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसात जायकवाडी धरणात जवळपास ६५ टीएमसी पाणी दाखल झाले. त्यामुळे या धरणात बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास ५८ टक्के जिवंत पाणी साठा झाला आहे.

जायकवाडीत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

जायकवाडी धरणाची १०२ टीएमसी साठवणूक क्षमता असून नाशिकमधील मुसळधार पावसामुळे यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी मध्यरात्री या धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला. मराठवाड्यातील काही भागासाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र, अद्यापही येथील इतर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा न झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत.

आज घडीला मराठवाड्यातील धरणाची परिस्थिती

  • जायकवाडी - ५७.७८%
  • लोअर दुधना - उणे १९.३२%
  • येलदारी - उणे २.७५%
  • सिद्धेश्वर - उणे ६३.४९%
  • माजलगाव - उणे २५.१९%
  • मांजरा - उणे २२.८८
  • इसापूर - ९.७२
  • लोअर मनार - १२.१९
  • लोअर तेरणा - उणे १७.०७
  • विष्णुपुरी - ००.००
  • सीना कोळेगाव - उणे ८७.४८
  • शहागड वेअर - ००.००
  • खडका वेअर - ६.०२

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी मराठवाड्यातील बहुतांश भागात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात प्रसन्न असलेला वरुणराजा मराठवाड्यावर कधी कृपादृष्टी दाखवणार, याकडे मराठवाड्यातील नागरिकांचे डोळे लागले आहेत.

Last Updated : Aug 7, 2019, 4:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details