महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औषधी कंपन्या लुटारू झाल्यात, आयोडीन मॅन पद्मश्री डॉ चंद्रकांत पांडव यांनी व्यक्त केली खंत

Iodine Man : आयोडीनयुक्त मिठाचा वापर केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम मेंदूवरही होतात. त्यामुळं दैनंदिन आहारात याचं सेवन योग्य प्रमाणात झालं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी आजही ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सुविधा म्हणावे तशा मिळाल्या नाहीत. देशातील औषधी कंपन्या लुटारूचं काम करत असल्याची खंत ‘आयोडिन मॅन’ म्हणून ओळख असलेले, पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव (Dr Chandrakant Pandav) यांनी व्यक्त केली.

Iodine Man
आयोडीन मॅन पद्मश्री डॉ चंद्रकांत पांडव

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 10:23 PM IST

प्रतिक्रिया देताना आयोडीन मॅन पद्मश्री डॉ चंद्रकांत पांडव

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात औषधी कंपन्या लुटारूचं काम करत आहेत, अशी खंत 'आयोडीन मॅन' असणारे पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांनी व्यक्त केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे झाली. तरी देखील अजून ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळं काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. आयुर्वेदात सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी छोटा अभ्यासक्रम घेतल्यास, चांगली सुविधा उपलब्ध होईल असं मत डॉ. पांडव (Dr Chandrakant Pandav)यांनी व्यक्त केलं. शहरात सुरू असलेल्या पद्म फेस्टिवलमध्ये भावी पिढीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.




शहरात दुसऱ्या पद्म फेस्टिवलचं आयोजन : शहरात ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीनं दुसरा पद्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशात आतापर्यंत पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार केला जातो. तर, नवीन पिढीला त्यांचं काम आणि त्यांचे विचार कळावे यासाठी या फेस्टिवलचं आयोजन केले गेलं आहे. यंदाच्या वर्षी 12 पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे. यातून नवीन पिढीला ज्ञान मिळेल, अशा व्यक्ती जीवनाला नवीन आकार देऊ शकतात. त्यामुळं या पद्म फेस्टिवलचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष अजय देशपांडे यांनी दिली.



वैद्यकीय सुविधा चिंताजनक : देशात आरोग्य सुविधा गंभीर समस्या झालेली आहे. विशेषतः औषधी कंपन्यांकडून औषधाच्या किंमती खूप अधिक आहेत. त्यामुळं गोरगरिबांना उपचार घेण्यात अडचणी येत आहेत. तीन रुपयांची गोळी तीस रुपयांना विकली जाते ही खरी अडचण आहे. देशात जेनेरिक औषधी आता उपलब्ध होत आहेत, मात्र त्याची उपलब्धता किती आहे, त्याला देखील मर्यादा आहेत. देशाचे लोकसंख्येच्या मानाने इतक्या अधिक औषधी उपलब्ध करणे सध्या शक्य नाही, तोपर्यंत खाजगी व्यावसायिक मजा करत आहेत त्यांना लुटारू म्हणलं पाहिजे, अशी खंत डॉ. पांडव यांनी व्यक्त केली.



ग्रामीण भागात सुविधा वाढायला पाहिजे :ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सुविधा म्हणावे तशा मिळाल्या नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी आजही दयनीय अवस्था पाहायला मिळते. इस्रायलमध्ये ज्या पद्धतीने दोन वर्ष सैन्यात सेवा देणे अनिवार्य आहे, तसाच प्रयोग आपल्याकडे झाला पाहिजे. नवीन डॉक्टरांना पहिली दोन वर्ष ग्रामीण भागात सक्तीने सेवा देणं बंधनकारक केलं पाहिजे. त्याचबरोबर नर्स या डॉक्टर पेक्षा चांगलं काम करतात, सुविधा देतात. अशा चांगल्या नर्स यांना देखील डॉक्टर होण्याची संधी दिली तर अधिक फायदेशीर राहू शकतं. त्याचबरोबर आयुर्वेदात काम करणारे डॉक्टर मोठ्या संख्येने आहेत, त्यांना देखील एका वर्षाचा अभ्यासक्रम देऊन प्रशिक्षित केलं तर देशात वैद्यकीय सेवेत बदल घडेल असं मत डॉ. चंद्रकांत पांडव यांनी व्यक्त केलं.



देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली: शरीराला आयोडीनची नितांत गरज असते. मात्र खूप गरजेचा असतो, रोज फक्त दीडशे ग्राम लागतो आणि त्याला रोज खाणं गरजेचं असतं. जागतिक आरोग्य संस्थांनी त्यावर काम केलं. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली आणि आयोडीन वापरण्यास सुरुवात झाली. 1984 मध्ये ५ टक्के लोक आयोडीन खात होते. मात्र आज ९७ टक्के लोक आयोडीन खातात ही एक क्रांती आहे. लोकांचं भलं करण्याचं भाग्य मला मिळालं, पुढच्या पिढीसाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद असल्याचं मत पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांनी केलं.

हेही वाचा -

  1. ऑगस्टमध्ये या '5' औषधी कंपन्यांचे शेअर बाजारात येणार आयपीओ, 8 हजार कोटींचा निधी जमण्याची अपेक्षा
  2. 'नो प्रिस्क्रिप्शन नो मेडिसिन'.. विनाकारण औषधांच्या चिठ्यांची 'लक्षणे' तपासा
  3. चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या होणार सुरू, 30 टक्के कामगार करणार काम

ABOUT THE AUTHOR

...view details