औरंगाबाद -हायवा ट्रक चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून आणखीही मोठया प्रमाणात हायवा ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ भेट दिली. यावेळी जीवन कराड यांच्याकडे विचारपूस केली असता सचिन सुभाष बडे, (वय ३० वर्ष, रा.हिवरशिंगा ता.शिरूर कासार जि. बीड), गणपत परमेश्वर जायभाय (वय ४५ वर्ष, रा. महाकाल अंकुशनगर कारखाना, ता.अंबड जि. जालना), ज्ञानेश्वर सर्जेराव दहीफळे (वय ३० वर्ष, रा. विठ्ठलवाडी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर), राजेंद्र शंकर देवकर (वय ४० वर्ष, रा. सर्वे नंबर १४, चारणवाडी, देवळाली कॅम्प नाशिक), (सोपान प्रभाकर मोरे, वय ३६ बर्ष, रा. उखळवाड़ी, पोरट जाटनांदर, ता. शिरुर कासार जि. बीड) राहूल श्रीमंत दुर्लेकर (वय २६ वर्ष, रा. नरोटेबाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर) यांना ट्रकसह ताब्यात घेतले आहे.