औरंगाबाद - लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सामील व्हावे म्हणून निवडणूक आयोग वेगवेगळे उपक्रम करत असते. असाच एक उपक्रम औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे राबवण्यात आला आहे. मतदान करा आणि लाडू खा, असा अनोखा उपक्रम या प्रतिष्ठानने राबविला आहे. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवल्यावर मतदारांना बुंदीचा लाडू देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, अशी आशा कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे व्यक्त करण्यात आली.
मतदान करा आणि लाडू खा; कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम - Maharashtra assembly polls
मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून उत्सवात आपण तोंड गोड करतो, अशी आपली परंपरा आहे. या परंपरेनुसार मतदान करणारा व्यक्ती लोकशाहीच्या उत्सवात सहभागी असतो. अश्या व्यक्तींचे तोंड गोड करण्यासाठी आणि मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी कुलस्वामिनी प्रतिष्ठानने बुंदीचे लाडू वाटत लोकशाहीचा उत्सव साजरा केला.

हेही वाचा -विधानसभा निवडणूक : यंदा मतदानाचा टक्का घसरला, अंदाजे ५६ टक्के मतदान
कुलस्वामीनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कोरडे यांनी आपली गाडी फुलांनी सजवून या गाडीवर मतदान करा आणि लाडू खा, असे घोषवाक्य लिहिले आहे. मतदाराने बोटावरची मतदान केल्याची शाई दाखवल्यावर त्यांना शुद्ध तुपातला बुंदीचा लाडू देण्यात आला. सिडको परिसरात पाच ते सहा केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला. लोकशाही उत्सव साजरा करत असताना मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याच कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे सांगण्यात आले.